मुंबई ते पुणे प्रवास वेगवान, इंटरसिटी एक्स्प्रेसला डबल इंजिनाची पॉवर

79

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेचा मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. मुंबई ते पुणे धावणार्‍या इंटरसिटी एक्स्प्रेसला पुढे आणि मागे अशी दोन इंजिने लावून केलेली ‘पुशपूल’ चाचणी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ 35 ते 40 मिनिटांनी कमी होणार आहे.  

35 ते 40 मिनिटांचा वेळ वाचणार

ट्रेन क्र. 12127 मुंबई ते पुणे इंटरसिटी सकाळी 6.40 वाजता सीएसएमटीहून सुटते. आता ती सकाळी 6.45 वाजता सुटणार आहे आणि पुण्याला ती सकाळी 9.57 वाजता पोहचायची ती आता सकाळी 9.20 वाजता पोहचणार आहे. म्हणजे जाताना सुमारे 40 ते 42 मिनिटांची बचत होईल तर येताना ट्रेन क्र. 12128 पुण्याहून ती सायंकाळी 5.55 ऐवजी 6.30 वाजता सोडण्यात येणार असून सीएसएमटीला ती पूर्वीच्याच वेळी म्हणजे रात्री 9.05 वाजता पोहचेल. म्हणजेच 35 मिनिटांची बचत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या