प्रचार तर होणारच…

3

सामना प्रतिनिधी । मुंबई

अखिल भारतीय मातंग संघ (बी गट) सर्व समाज सामाजिक टीमच्या वतीने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे अध्यक्ष बी. जी. गायकवाड यांनी मंगळवारी दुपारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे पत्र दिले.

यावेळी शिवसेना नेते लीलाधर डाके पदाधिकारी रमेश हिवाळे, संतोष गायकवाड, विक्रांत पांढरे, माजी शाखाप्रमुख शरद इंदुलकर आदी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीतही मातंग समाजाने शिवसेनेला पाठिंबा देऊन प्रचार केला होता. घाटकोपर, कुर्ला, विक्रोळी, कांजुरमार्ग आदी भागांत झालेल्या सभांमध्ये सहभागी होऊन मातंगाची मते शिवसेनेकडे वळवण्याचे काम केले होते. आता लोकसभा निवडणुकीतही मातंग समाज शिवसेनेला जाहीर पाठिंबा देऊन प्रचार करणार असल्याचे बी. जी. गायकवाड यांनी सांगितले.

poonam-f

शिवसेना-भाजप-रिपाइं (ए)-रासप महायुतीच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारासाठी मंगळवारी कुर्ला विधानसभा क्षेत्रात दणदणीत प्रचार रॅली झाली. पेस्तम सागरपासून रेतीबंदरपर्यंतच्या या रॅलीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांच्यासह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.