सलमानने सिनेमातून हटवले पाकिस्तानी गायकाचे गाणे

सामना प्रतिनिधी। मुंबई

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ अभिनेता सलमान खानने आपल्या आगामी ‘नोटबुक’ या सिनेमातून पाकिस्तानी गायक आतिफ असलमचे गाणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नुकतेच सलमानने आपल्या प्रॉडक्शन हाऊसला आदेश दिले आहेत. त्यामुळे आतिफ असलमने गायलेले गाणे पुन्हा एकदा रेकार्ंडग करावे लागणार आहे.

‘टोटल धमाल’च्या टीमने केली शहीदांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी ‘टोटल धमाल’ या चित्रपटाच्या टीमने पुढाकार घेतला आहे. या चित्रपटात काम करणाऱया अभिनेता-अभिनेत्रींसह प्रत्येक छोटय़ामोठय़ा व्यक्तींनी 50 लाखांची मदत जमा केली आहे. ही मदत शहीदांच्या कुटुंबीयांसाठी देण्यात येणार आहे. तसेच सद्यस्थिती पाहता ‘टोटल धमाल’ हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय चित्रपटाच्या संपूर्ण टीमने घेतला आहे, असे अजयने ट्विटरवर जाहीर केले आहे.