सेन्सेक्सची 10 वर्षांतील विक्रमी उसळी

5

सामना प्रतिनिधी। मुंबई

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर रविवारी सायंकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोलचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले. शेअर बाजाराने 10 वर्षांतील विक्रमी उसळी घेतली.

सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1421 अंकांनी तर निफ्टीचा निर्देशांक 421 अंकांनी वधारला. दिवसभराचे कामकाम थांबल्यावर बीएसई&&&चा निर्देशांक 39 हजार 352 आणि एनएसई 11 हजार 828 अंकावर स्थिरावला. एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर सोमवारी सकाळी अपेक्षेप्रमाणे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सकाळी साडेनऊ वाजता शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने उसळी घेतली. व्यवहार सुरू होताच तो 946 अंकांनी वधारला तर निफ्टी 20 अंकांनी वधारला.

आपली प्रतिक्रिया द्या