स्विगी, झोमॅटो, डोमिनोज, उबर फूड कंपनींच्या बेशिस्त रायडर्सविरोधात धडक कारवाई

सामना प्रतिनिधी । मुंबई

हॉटेलमधून घेतलेले खाद्यपदार्थ संबंधितंकडे वेळेत पोहचवण्यासाठी सुसाट दुचाकी चालवणाऱ्या स्विगी, झोमॅटो, डोमिनोज, उबर फूट कंपनींच्या रायडर्सचे आता काही खरे नाही. झटपट डिलिव्हरी देण्याच्या नादात ते रायडर्स वाहतूक नियम पायदळी तुडवत असल्याने वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. अशा रायडर्सविरोधात मंगळवारपासून पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.

शहरात स्विगी, झोमॅटो, डोमिनोज, उबर फूड कंपनीचे रायडर्स दुचाकीवरून वेगात जाताना दिसतात. नागरिकांना गरमागरम खाद्यपदार्थ काही मिनिटांच्या आत देण्यासाठी त्या रायडर्सची अक्षरश: वेगाशी स्पर्धा सुरू असते. वेळेत पोहचण्यासाठी रायडर्स रॅश ड्रायव्हिंग, सर्रास, सिग्नल जंपिंग करतात, राँग साइडने हवी तशी गाडी चालवतात, तर बरेचरायडर्स हेल्मेटदेखील घातल नाहीत. याबाबत वारंवार तक्रारी येऊ लागल्याने त्याची वाहतूक पोलिसांनी दखल घेत अशा रायडर्सविरोघात कारवाईला सुरुवनात केली आहे. मंगळवारी पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणआऱ्या 174 रायडर्सविरोधात कारवाईकेली. त्यात दोन चालक ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करतानादेखील सापडले. त्या चालकांना नियमानुसार चलान करण्यात आले आहे. खाद्यपदार्थांची झटपट डिलिव्हरी देण्याच्या नादात स्विगी, झोमॅटो, डोमिनोज, उबर फूडच्या काही रायडर्सकडून नियमांचे उल्लंघन होऊ नये तसेच अपघाताची घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून आम्ही बेशिस्त रायडर्सविरोधोत मोहीम हाती घेतल्याने उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी सांगितले.

वाहतुकीचे नियम तोडताना जे 174 रायडर्स मंगळवारी सापडले त्यांचे समुपदेशन करण्यात आले असून पुन्हा असे न करण्याबाबत समज देण्यात आली आहे. तसेच ते रायडर्स ज्यांच्यासाठी काम करतात त्या फूड डिलिव्हरी देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनाही पोलिसांनी समजून सांगितले आहे. शिवाय ज्यांच्यावर कारवाई केली आहे त्यांना तत्काळ दंड भरण्यास सांगावे व जो वारंवार चूक करताना आढळेल त्या रायडर्सची यादी आम्ही देऊ, मग त्याचा ऍप बंद करावा अशीही ताकीद पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

वेळेच बंधन बंद करा

30 मिनिटांत पिझ्झा घरपोच पोहचवू असे डोमिनोजकडून सांगितले जाते. ही वेळ पाळण्याच्या नादात रायडर्स वाटेल तशी दुचाकी चालवतात. परिणामी त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईसारख्या शहरात असे वेळेत पोहचणे शक्यही होत नाही. त्यामुळे याबाबत आम्ही डोमिनोजशी चर्चा केली असून खाद्यपदार्थ पोहचविण्यासाठी वेळेचे बंधन ठेवू नये अशीही पोलिसांकडून त्यांना समज देण्यात आली आहे.

शहरात स्विगी, झोमॅटो, डोमिनोज, उबर फूड कंपनींच्या काही रायडर्सकडून वाहतूक नियमांची पायमल्ली होताना सर्रास दिसते. त्यांच्याविरोधात वारंवार तक्रारीदेखील येत होत्या. त्यांच्याकडून अपघात घडू नये तसेच नागरिकांना त्यांचा नाहक त्रास होऊ नये यासाठी आम्ही तशा बेशिस्त रायडर्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त (वाहतूक)