माजी कुलगुरू डॉ. शशिकांत कर्णिक यांचे निधन

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शशिकांत कर्णिक यांचे काल रात्री शारजा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्रीच शारजा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. कर्णिक हे इतिहासाचे प्राध्यापक होते. त्यांनी सहा वर्षे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले. डॉ. कर्णिक यांनी बृहत् भारतीय समाज, भारतीय शिक्षा संस्था तसेच धीरूभाई अंबानी फाऊंडेशनच्या विश्वस्तपदीही काम केले आहे. तसेच एमपीएससीचे अध्यक्ष आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली.