उद्योगपतींच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे खरे रूप पुढे आले

1

सामना प्रतिनिधी। मुंबई

दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी व उदय कोटक यांनी पाठिंबा दिला आहे. यावर भाजपने टीका केली असून उद्योगपतींच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे खरे रूप पुढे आले आहे, अशा शब्दात भाजपने काँग्रेसचा समाचार घेतला आहे.

शिक्षण मंत्री विनोद तावडे प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की, मोदी सरकार हे अंबानी, अदानी यांचे सरकार आहे असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करतात पण मिलिंद देवरा यांना अंबानी व कोटक यांनी पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.