अमिताभ बच्चन यांचा अंगरक्षक निलंबित

अमिताभ बच्चन यांचा माजी अंगरक्षक कॉन्स्टेबल जिंतेद्र शिंदे याच्यावर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तीन प्रकरणांत तो दोषी आढळल्याने त्याला निलंबित करून त्याच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे हा बरीच वर्षे अमिताभ बच्चन यांच्याकडे अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. मात्र तो वर्षाला एक कोटीहून अधिक कमावतो असा गाजावाजा झाल्यानंतर शिंदेची डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी त्याची चौकशी केली असता तो तीन प्रकरणांत दोषी सापडला.