दुसऱया यादीत घसरलेल्या कटऑफचे तिसऱया यादीत टेकऑफ, अकरावीची शेवटची गुणवत्ता यादी 97 टक्क्यांवर

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तिसऱया गुणवत्ता यादीच्या कटऑफने उच्चांक गाठला असून दुसऱया यादीपेक्षा तिसऱया यादीत कटऑफमध्ये तब्बल 4 ते 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे तिसऱया यादीत तरी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल या आशेवर असलेल्या विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली आहे. तिसऱया यादीसाठी 1 लाख 44 हजार 186 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी 57 हजार 147 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला आहे. आजच्या शेवटच्या यादीनंतरही 87 हजार 30 विद्यार्थी अद्यापही प्रवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत असून 97 हजार 206 जागा रिक्त राहिल्या आहेत. 

तिसऱया कॅप फेरीसाठी एकूण 1 लाख 54 हजार 353 जागा शिल्लक होत्या. या यादीत प्रवेश देण्यात आलेल्या 57 हजार 147 विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रवेशाची ही शेवटची नियमित फेरी असून यानंतर विशेष फेरी सुरू करण्यात येणार आहे. एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 979 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे, तर 9 हजार 478 विद्यार्थ्यांना दुसऱया, तर 7 हजार 689 विद्यार्थ्यांना तिसऱया पसंतीचे कॉलेज अलॉट केले आहे. सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 14 जुलै सायंकाळी 6पर्यंत मुदत दिली आहे. हे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा, प्रवेशापासून वंचित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन 15 जुलैला विशेष प्रवेश फेरीचे नियोजन जाहीर होणार आहे. 

शाखानिहाय झालेले प्रवेश 

शाखा        उपलब्ध जागा        झालेले प्रवेश 

आर्ट्स         22693               4862 

कॉमर्स        83217               34022 

सायन्स       45909               17934 

एचसीव्हीसी  2534                 329 

एकूण        154353             57147 

  • अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या प्रत्येक गुणवत्ता यादी वेळी विद्यार्थ्यांना कॉलेज पसंतीक्रम बदलण्याची संधी असते. त्यामुळे आधीच्या प्रवेश फेऱयांवेळी पहिल्या पसंतीचे कॉलेज न मिळालेले अनेक गुणवंत विद्यार्थी तिसऱया यादीपर्यंत वेटिंगवर राहिले. त्यामुळे अनेक कॉलेजचा दुसऱया यादीत खाली आलेला कटऑफ या विद्यार्थ्यांमुळे वाढल्याचे दिसत आहे. 
  • एचआर कॉलेजचा कॉमर्सचा कटऑफ 93 टक्क्यांवरून 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर जयहिंद कॉलेजच्या सायन्सच्या कटऑफमध्ये विक्रमी वाढ झाली असून दुसऱया यादीत 86.6 टक्क्यांवर असलेला कटऑफ आता 97.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. केसी कॉलेजचा आर्ट्सचा कटऑफही मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. दुसऱया यादीत 86.4 टक्क्यांवर कटऑफ होती. तिसऱया यादीत ती 95.4 टक्क्यांवर पोहोचली आहे. 

काही कॉलेजच्या कटऑफ (कंसात दुसऱया गुणवत्ता यादीतील टक्केवारी) 

  • एचआर: कॉमर्स  97 (93)  
  • झेवियर्स: आर्ट्स 96 (93.8), कॉमर्स 88.6 (88),सायन्स 92.6 (89.2)
  • केसी: आर्ट्स 95.4 (86.4), कॉमर्स 95.6 (91.2), सायन्स 95.8 (86)   
  • जयहिंद : आर्ट्स 92 (90.6) , कॉमर्स 97.4 (92.2),सायन्स 97.6 (86.6)
  • रूईया :आर्ट्स 92.4 (92.4), सायन्स 96.2 (91.8)  
  • पोदार: कॉमर्स 97 (92.8)  
  • रूपारेल: आर्ट्स 87.6 (86.4),  कॉमर्स 89.4 (88.8), सायन्स 91.2 (89.4)  
  • एसआयईएस: 85.6 (85.4)
  • साठये:आर्ट्स 80.8 (79), कॉमर्स 88 (87),सायन्स 91.4 (87.6)
  • डहाणूकर: कॉमर्स 90 (89.6)
  • भवन्स, अंधेरी: आर्ट्स 77.8 (78) , कॉमर्स 87.6 (87.2), सायन्स (87) 86.4  
  • मिठीबाई: आर्ट्स 87.2 (87.8), कॉमर्स 91.2 (90.6),सायन्स 90.2 (87)
  • एनएम: कॉमर्स 95.6 (92.8)  
  • वझेकेळकर: आर्ट्स 91 (86.8), कॉमर्स 92.6 (90.6),सायन्स 94.6 (91.4)
  • मुलुंड कॉलेज: कॉमर्स 92.6 (90.6)
  • बांदोडकर: सायन्स 92.6 (90.6)
  • सीएचएम: आर्ट्स 74.4 (66.6) कॉमर्स 80.6 (83.4),सायन्स 94.6 (89.4)
  • फादर ऍग्नेल: कॉमर्स 86.2 (84.6)  
  • ज्ञानसाधना: आर्ट्स 71.6 (46.6), कॉमर्स 74.6 (73.2),सायन्स 81.6 (81.6)
  • बिर्ला: आर्ट्स 86.4 (60.4), कॉमर्स 87.4 (85), सायन्स 94.8 (90.4)