मुंबई विद्यापीठाच्या 3500 प्राध्यापकांना ई-कंटेंट निर्मितीचे प्रशिक्षण

मुंबई विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील 3500 प्राध्यापकांना ई-कंटेंट निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे ई-कंटेंट विकास केंद्र सुरू झाले असून या माध्यमातून शिक्षकांना ई-कंटेंट निर्मितीचे प्रशिक्षण देईल तसेच ऑनलाइन अभ्यासक्रमासाठीही उपयुक्त ठरणार आहे. या केंद्राचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्पे, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे उपस्थित होते.

ई-कंटेंट डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील 3500 प्राध्यापकांना ई-कंटेंट निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या प्रस्तावित ऑनलाइन अभ्यासक्रमासाठीही ई-कंटेंट निर्मितीचे कार्य या केंद्रामार्फत होणार आहे.