संगमनेरमध्ये एसटी बस पलटी; 40 विद्यार्थी जखमी

st bus accident sangamner nagar

नगर येथे अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस जागीच पलटी झाल्यानं यातील काही शालेय विद्यार्थी जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आलेत.

अपघाताची ही घटना नगरमधील संगमनेरमध्ये घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस राहुरीकडून संगमनेरकडे निघाली होती. वाटेतच बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावर पलटी झाली. बसमधील 40 विद्यार्थी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.