नियोजन करून 25 मेपर्यंत पाणी  पूरवावे- जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांची मागणी

1

सामना प्रतिनिधी |कोपरगाव 

20 मे दरम्यान गोदावरी कालव्यांना पाणी सुटणार असल्याने कोपरगाव नगरपालिकेने साठवण तलावात असलेल्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित करून 25 मे पर्यंत कोपरगाव शहराला पाणी पुरवावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी कोपरगाव नगरपालिकेला केले आहे. तसेच नागरिकांनी पाण्याची  काटकसर करून सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले.

कालपासून नगरपालिकेने कोपरगाव शहराला 4 मेपर्यंत पाण्याचे आवर्तन देणार असल्याचा भोंगा फिरविला आहे. सध्याच्या पाणी चक्राचा विचार करता ते पाणी 12  दिवस पुरवावे लागणार आहे. याचा अर्थ  16 मे पर्यंत कोपरगाव शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये  पाणीसाठा राहणार आहे असे झावरे म्हणाले. तसेच प्राप्त माहितीनुसार  20 मेच्या दरम्यान  गोदावरी कालव्याचे आवर्तन सुटणार आहे.  ते पाणी कोपरगाव साठवण  तलावात  25 मे च्या दरम्यान पोहोचणार आहे.  याचा अर्थ 16 मे ते 25 मे हे मधले  9 दिवस कोपरगाव शहर कोरडे राहण्याची शक्यता आहे. आता यासाठी पालिकेने 4 मे नंतर 12 ते 16 मे पर्यंत  आणखीन एक आवर्तन घेण्याचे नियोजन केले तर ते पाणी  26 ते 27 मे पर्यंत  कोपरगाव करांना पुरू शकते.  तोपर्यंत कालव्याचे  पाणीही साठवण तलावात येईल. त्यामुळे सर्व सुरळीत होऊन  कोपरगाव शहरावरील पाणी संकट  दूर होईल, असेही झावरे यांनी सांगितले.