म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा मेळावा उत्साहात

3

सामना प्रतिनिधी, नाशिक

महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबतची कार्यवाही सुरु आहे. मेडिक्लेमचा हप्ता पूर्ण महापालिकेने द्यावा आणि वैद्यकीय भत्ता वाढ याबाबत कर्मचारी सेनेने केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले.

दुर्वांकुर लॉन्स येथे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा मेळावा पार पडला, यावेळी आयुक्त अभिषेक कृष्णा बोलत होते, शहराचा योग्य विकास करणे, स्वच्छता राखणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. यावेळी शिवसेना उपनेते बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही मार्गदर्शन केले.

कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे म्हणाले की, संघटनेने अधिकारी, कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान, गेल्या पाच वर्षांपासून न मिळालेले गणवेश आणि रेनकोट मिळवून दिले. विद्युत विभागातील वायरमन्स, सुरक्षा रक्षक, सफाई कामगारांचे प्रश्न संघटना सतत प्रशासनासमोर मांडत आहे. आउट सार्ंसगच्या नावाखाली ठेकेदारी पद्धतीने भरतीला आमचा कायम विरोध राहील, असे ते म्हणाले.

यावेळी कामगारांचे प्रश्न, मागण्या याबाबत चर्चा करण्यात आली. शंभर टक्के पदोन्नती मिळाली पाहिजे, मेडिक्लेमचा पूर्ण हप्ता महापालिकेनेच भरावा या प्रमुख मागण्या, तसेच आउटसार्ंसगच्या नावाखाली ठेकेदारी पद्धतीने कामगार भरतीला तीव्र विरोध करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला.

याप्रसंगी गटनेते विलास शिंदे, नगरसेवक रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, डी.जी. सूर्यवंशी, संतोष गायकवाड, प्रशांत दिवे, श्याम साबळे, सुधाकर बडगुजर, लोकेश गवळी आदी उपस्थित होते. क्रीडापटू नेहा चव्हाण हिला सुवर्णपदक मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. या मेळाव्यानिमित्त नाशिकरोड विभागातील शंभर कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढली होती.

या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जगदीश पाटोळे, रमाकांत क्षीरसागर, जीवन लासुरे, श्रीहरी पवार, सुरेश आहेर, एल. आर. थोरमिसे, शंकरराव खेलूकर, सुरेंद्र बोरा, भाऊसाहेब मुठाळ, विजय गवारे, नंदू खांडरे, हिरामण लोंढे, सुधाकर हांडोरे, महेंद्र नाठे, भगवान शिंदे, सुनील नलावडे, रवी येडेकर, विवेक जोशी, राजू निरभवणे, लता पाटील, ज्योती देशमुख, हेमंत रौंदळ, अन्वरखान पठाण आदींनी परिश्रम घेतले. यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिटू पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
या मेळाव्यात सिटू संघटनेचे उपाध्यक्ष रावसाहेब रुपवते, सचिव दीपक लांडगे, रवी जाधव, सुनील राठोड, राजू गायकर यांच्यासह दोनशे कर्मचाऱ्यांनी म्युनिसिपल कर्मचारी सेनेत प्रवेश केला आहे.