मुन्नी बदनाम झाली आता मुन्नाही बदनाम होणार

7

सामना ऑनलाईन, मुंबई

अभिनव कश्यप दिग्दर्शित ‘दबंग’  सिनेमातील ‘मुन्नी बदनाम हुई ’  हे गाणं तुफान प्रसिद्ध झालं होतं.  ह्या गाण्यामध्ये मलाईका अरोराने केलेला डान्स आजही अनेकांच्या स्मरणात आहे. 9 वर्षानंतरही या गाण्याची क्रेझ काही कमी झालेली नाहीये. 2 वर्षांपूर्वी दबंगचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करीना कपूरने ‘फेवीकॉल से’ या गाण्यावर डान्स केला होता, मुन्नी बदनाम हुई प्रमाणे हे गाणं देखील बरंच गाजलं होतं. आता दबंग चित्रपटाचा तिसरा भाग येणार असून यामध्ये कोणाचा आयटम डान्स असणार असा अनेकांना प्रश्न पडला होता. या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून चित्रपटात यंदा मुन्नी नाही तर मुन्ना बदनाम झालेला बघायला मिळणार आहे.

साजीद-वाजीद यांनी ‘ मुन्ना बदनाम हुआ’  हे गाणं लिहलं असून ते कमाल खानने गायले आहे.या गाण्यामध्ये बादशाहचे रँपही ऐकायला मिळेल. दबंग- 3 मध्ये स्थानिक गुंड पोलीस कसा होतो हे दाखवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या सिनेमामध्ये पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा नायिकेच्या भुमिकेत दिसणार असून चित्रपटात आणखी एक अभिनेत्री बघायला मिळणार आहे. ही अभिनेत्री जून महिन्यात कामाला सुरूवात करणार आहे. मुन्ना बदनाम हुआ गाण्यामध्ये ही अभिनेत्री सलमान खानसोबत नाचताना दिसणार आहे.

मुन्ना बदनाम हुआ या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन हे या चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या प्रभूदेवानेच केले आहे. चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता सुदीप सिकंदर भारद्वाज नावाच्या खलनायकाची भूमिका करत असून काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि सुदीप यांच्यातील दृश्यं चित्रीत करण्यात

आपली प्रतिक्रिया द्या