माजी मंत्री क्षीरसागरांच्या राजुरीत तरुणाचा खून

सामना प्रतिनिधी । बीड

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नवगण राजुरी या गावामध्ये जुन्या वादातून एका 30 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हारुग्णालयात नेण्यात आला असून रुग्णालयात प्रचंड जमाव जमलेला आहे. मोठा जमाव जमा झाल्याने पोलीस प्रशासन ही दाखल झाले आहे.

राजुरी येथील गणेश नारायण बहिर (30) या तरुणाचा गुरुवारी जुन्या वादातून खून करण्यात आला आहे. ही हत्या कोणी केली याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. गणेश बहिर याला जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हारुग्णालयात मोठा जमाव जमला असल्याने पोलीस प्रशासनही दाखल झाले आहे, राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनीही रुग्णालयात धाव घेतली आहे.