एकतर्फी प्रेमातून विवाहीतेची गळा चिरून हत्या

सामना प्रतिनिधी । जालना

एकतर्फी प्रेमातून विवाहीत महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जालना शहरातील मोतीबाग चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कल्पना रवी खिल्लारे असं मृत महिलेचं नाव आहे.

दारूच्या नशेत एकतर्फी प्रेमातून माथेफिरू नराधमाच्या हे कृत्य केल्याचं समोर येत आहे. सचिन सुभाष सुपारकर असं आरोपीचं नावं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कदीम जालना पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.