ज्या घरात वावरला त्याच घरातील मुलाचा केला खून, परप्रांतीय तरूणाला अटक

6

सामना प्रतिनिधी । पुणे

परप्रांतीय असूनही अनेक वर्षापासून ज्यांच्या घरात खुला वावर होता, खाण्या पिण्यालाही कोणी कधीच नाही म्हणले नाही. परंतू, शेवटी हा घरभेदी निघालाच. पैशाच्या कारणावरून या घरातील 10वीत शिकणाऱ्या मुलाला जबरदस्तीने वारज्यातील म्हाडा कॉलनीच्या पाठीमागे असलेल्या दोडके यांच्या शेतात नेले. तेथे गळा आवळून व डोक्यात सिमेंटची वीट घालून खून केला. त्यांनतर मित्राच्या मदतीने त्याचा मृतदेह निर्जण ठिकाणी पुरला. चार दिवसांनी हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी एकाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. निखिल अनंत अंग्रोळकर (वय 16, रा. विठ्ठलनगर, वारजे माळवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. विनयसिंग विरेंद्रसिंग राजपूत (22) या तरुणाला अटक केली आहे. ऋषीकेश पोळ याचा शोध सुरू आहे.

अंग्रोळकर आणि राजपूत हे विठ्ठलनगरमध्ये शेजारी राहायला आहेत. मुळचा उत्तरप्रदेशातील असलेले रजपूत कुटूंबीय आणि अंग्रोळकर यांचे चांगले संबंध होते. अनेक वर्षांपासून विनयसिंग रजपूत हा त्यांच्या घरी येत जात होता. अनेकादा तो घरी जेवणही करत. या दोन्ही कुटूंबाबमध्ये जिव्हाळ्याचे संबंध होते. निखील हा 10वीत शिकत होता, तर रजपूत हा वारज्यातील पार्थ जीममध्ये इंस्ट्रक्टर होता.

रविवारी सायकांळी निखील अंग्रोळकर हा घरातून बाहेर पडला, उशीर झाला तरी तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली, यावेळी विनय रजपूत हा देखील मदतीला धाऊन आला. रविवारी रात्रभर निखील घरी न आल्याने सोमवारी वारजे पोलीस ठाण्यात याची तक्रार देण्यात आली. वारजे पोलिसांनी त्याच्या शाळेतील मित्रांकडे चौकशी केली, सीसीटीव्ही तपासले, शेजाऱ्यांकडे चौकशी केली पण पोलिसांना काहीच माहिती मिळत नव्हती. सोमवार आणि मंगळवारी प्रकरणात गती असताना बुधवारी रात्री निखीलचा खून करण्यात आला असून, त्याचा मृतदेह म्हाडा कॉलनीच्या मागे डोंगरात पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याची खातरजमा केली, यामध्ये रजपूतचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रात्री त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने खून केल्याची कबुली दिली. या प्रकारामुळे अंग्रोळकर कुटूंबीयांना जबरदस्त धक्का बसला.

पोलिसांनी रजपूतकडे केलेल्या चौकशीत त्याने रविवारी संध्याकाळी निखीलला गोड बोलून गाडीवर बसवून म्हाडा कॉलनीच्या मागे दोडके यांच्या शोतीत डोंगरावर बांधलेल्या ‘व्हाईट हाऊस’ या इमारतीमध्ये नेले. तेथे निखील हा गेम खेळत असताना त्याच्या त्याचा गळा आवळून खून केला, त्यानंतर डोक्यात सिमेंटची वीट घातली. खून केल्यानंतर त्याने ऋषीकेश पोळ याला व्हाईट हाऊस येथे बोलावून घेतले. त्याला धमकावून मदत करण्यास सांगितले. दोघांनी दुचाकीवरून निखीलचा मृतदेह सुमारे अर्धा किलोमिटर अंतरावर एका ठिकाणी नेऊन खड्ड्यात टाकला, तेथे असलेला राडारोडा त्यावर टावूâन मृतदेह पुरल्याची कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे म्हणाल्या, रपजपूत हा मुळचा उत्तरप्रदेशातील आहे. ते कुटुंबीयांसह पुण्यात रहातो. त्याला पैशांची गरज होती, त्यामुळे त्याने निखीलचा खून केला असण्याची शक्यता आहे. इतर दोन तीन कारणेही असून, त्यापैकी हे महत्वाचे कारण आहे.

बुधवारी सकाळी पोलिसांनी दोन्ही ठिकाणांची पहाणी केली. दुपारी नायब तहसीलदार संजय भोसले यांच्या उपस्थितीमध्ये निखीलचा मृतदेह राडारोड्यातून बाहेर काढला, त्यावेळी प्रचंड दुर्गंधी सुटली. सहाय्यक आयुक्त बाजीराव मोहिते, वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रभाकर खांडेकर यावेळी उपस्थित होते.

प्रेम प्रकरणातून हत्या ?
पोलिसांकडून पैशाच्या कारणातून निखीलचा खून केल्याचे सांगितले जात असले तरी, प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचीही शक्यता वर्तावली जात आहे. निखीलला आवडणाऱ्या एका मुलीबद्दल रजपूत हा शेरेबाजी करत असल्याने त्याला निखीलने जाब विचारला होता. त्याचा बदला घेण्यासाठी रजपूतने निखीलला गोड बालून निर्जण ठिकाणी नेऊन खून केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

ऋषिकेशला चार दिवस झोप नाही
निखीलचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रजपूतने ऋषिकेश पोळला बोलावून घेतले. हा प्रकार बघून त्याला धक्का बसला, पण रजपूतने तु मदत केली नाही तर तुझाही खून करेन अशी धमकी दिली. त्यामुळे तो मृतदेह पुरण्यासाठी घेऊन गेला. रविवारी रात्रीपासून ऋषिकेशला झोप येत नव्हती, तो जेवणही करत नव्हता. त्यामुळे त्याच्या भावाने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने घडलेला प्रकार भावाला सांगितला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर निखीलच्या गायब होण्यामागील सत्य समोर आले.

कुटूंबीय हवालदिल, नातेवाईकांची गर्दी
निखीलचा खून झाल्याचे समोर आल्याने अंग्रोळकर कुटूंबीयांना हा धक्का पचविणे कठिण झाले. निखीलचा पुरलेला मृतदेह बाहेर काढल्यांनतर त्याच्या वडीलांच्या अंगातील अवसानच गेले. पोलिसांनी आणि मित्रांनी त्या धीर दिला. मुलाचा मृतदेह पाहून वडीलांच्या अशृंचा बांध पुâटला. विनयसिंग घरी येत होता, जेवण करत होता, तो असे काही करेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते असे म्हणून त्याचे वडील मुलाच्या मृत्यूने विव्हळत होते. दरम्यान, निखीलच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी करून रजपूतवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. मृतदेह ससून रूग्णालयात घेऊन जाताना रूग्णवाहिका नातेवाईकांनी आडवून धरल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.