संभाजीनगर : तरुणाचा निर्घृण खून, मंदिरामागे फेकला मृतदेह

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर येथे तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला असून त्याचा मृतदेह सातारा परिसरातील रेणुका माता मंदिराच्या मागे आणून टाकण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी ही माहिती दिली आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटली नसून त्याच्या अंगामध्ये निळ्या रंगाचा जिन्सचा शर्ट असून त्याच्या हाताच्या नसा कापण्यात आल्या आहेत. उजव्या हतावर बदामचा पत्ता गोंदलेला असून त्यामध्ये एस.एस. असे अक्षर आहेत.

सोमवारी सकाळी या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रमोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटावी म्हणून त्याचे मृत अवस्थेतील छायाचित्र व्हॉटसअ‍ॅपवर टाकण्यात आले असल्याचे चंद्रमोरे यांनी सांगितले.