समलैंगिक संबंधातून आम आदमी पार्टीच्या नेत्याची हत्या, जिवंत जाळले

26


सामना ऑनलाईन । गाझियाबाद

आम आदमी पार्टीचे (आप) नेते नवीन दास यांच्या हत्ये प्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी बुधवारी तिघांना अटक केली आहे. नवीन दास यांची हत्या समलैंगिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी तैय्यब, तालिब आमि समर खान या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 लाख 85 हजार, आप नेते नवीन दास यांचा आयफोन, काही कागदपत्रे, स्कूटर, 3 मोबाईल फोनसह अन्य सामान जप्त केले आहे.

naveen-murder-accused

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आणि आरोपी तैय्यब यांची दीड वर्षापूर्वी एका गे पार्टीमध्ये ओळख झाली होती. यानंतर दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले की देशभरात अनेक ठिकाणी ते फिरायलाही गेले. तसेच ते दिल्लीमध्ये गे पार्टीचेही आयोजन करत होते. या पार्टीमध्ये सहभागी होणाऱ्यांकडून ते भरभक्कम रक्कम वसूल करत होते. तैय्यब कार्यक्रमाचे नियोजन करत होता व नवीन त्याला मदत करत होता.

पोलीस तपासादरम्यान तैय्यबने धक्कादायक माहिती उघड केली. नवीनने काही दिवसांपूर्वी दिल्लीतील छत्रपूर भागात एक फ्लॅट घेतला होता. यानंतर नवीन तैय्यबरवर ‘लिव्ह इन’मध्ये राहण्यासाठी दबाव टाकत होता. असे न केल्यास आपल्या संबंधांबाबत कुटुंबीयांनी माहिती देण्यात येईल अशी धमकी नवीन देत होता. यामुळे त्याच्या हत्येचा प्लॅन करण्यात आला आणि यात तालिब आणि समर खान यांनाही सहभागी करून घेतले, असेही त्याने तपासादरम्यान सांगितले. यानंतर 4 ऑक्टोबरला रात्री लोणी-भोपुरा रोडवर नवीनला बोलावून त्याला नशेचा पदार्थ खाऊ घालण्यात आला. तसेच त्याच्याकडून नशेत असताना एटीएम आणि नेटबँकिंगची माहिती घेऊन खात्यामधून 7 लाख काढण्यात आले. यानंतर नवीनला कारमध्ये बसवून कारसह पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या