बीड मध्ये गळा चिरून वृद्धेची हत्या 

20


सामना प्रतिनिधी । बीड

अयोध्यानगर भागात राहणार्‍या गिरी दाम्पत्यातील 50 वर्षीय महिलेचा गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. अज्ञात मारेकर्‍याने सदरील महिलेचा गळा चिरून सुरा बाजूच्या कोरड्या आडात पेâकून दिला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून घटनास्थळी पेठ बीड पोलीस तळ ठोकून आहे.

अयोध्यानगरमध्ये किसन गिरी हे आपली पत्नी शिलावती गिरी यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून राहतात. हे कुटुंब भिक्षुक असून भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. आज सकाळी किसन गिरी हे भिक्षा मागण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र घरी एकट्या असलेल्या शिलावती यांचा गळा चिरून अज्ञात मारेकर्‍याने खून केला. सदरची हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मारेकर्‍याने शिलावती यांचा गळा चिरल्यानंतर सुरा बाजूच्या  आडात फेकून दिल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणाची माहिती पोलिसांना झाल्यानंतर घटनास्थळी डीवायएसपी सुधीर खिरडकर, पेठ बीड ठाणचे पो.नि.बडे, पो.नि.लहानेंसह आदी पोलीस कर्मचार्‍यांची टीम दाखल झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या