जळगावात रिक्षा चालकाचा खून

1

सामना प्रतिनिधी । जळगाव

शहरातील रेल्वे स्थानक परिसरात गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास एका रिक्षाचालकाचा खून झाला. इस्माईल शहा गुलाब शहा उर्फ माल्या 38 वय असे मृत व्यक्तीचे नाव असून गुरुवारी दुपारच्या सुमारास  दोन रिक्षा चालकांचे जोरदार भांडण झाले त्या वरूनच ही घटना घडली. रेल्वे स्थानकावर वाढते अवैध धंदे, रात्रभर चालणाऱ्या हात गाड्या तसेच टवाळखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.  रेल्वे स्थानकावर प्रवासी भरण्यावरून रिक्षा चालकांमध्ये हाणामाऱ्या ही नित्याचीच बाब आहे.  परंतु खुनामुळे शहरात खळबळ उडाली आहे.