रत्नागिरीत महिलेचा खून केल्या प्रकरणी एकाला अटक, कारण अस्पष्ट


सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील भोके येथे चाकूने वार करून एका महिलेचा खून  करण्यात आला. आरोपीला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

शमिका पिलणकर (वय ३५)असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेवर चाकूने वार करून खून करण्यात आला. तिचा मृतदेह भोके येथे सापडला. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी संतोष बबन सावंत याला ताब्यात घेतले आहे. खून का केला याचा तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.