शिरूर तालुक्यातील मलठण येथे तरुणाचा खून

3

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील मलठण येथे एका ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा खून झाला. कोणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. याबाबत सदाशिव नानाभाऊ वाव्हळ रा. मलठण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी दिली.

मलठण, ता. शिरूर येथील राजयोग मंगल कार्यालयामागील बाजूस असणाऱ्या शेतात सदाशिव नानाभाऊ वाव्हळ हे शेतकरी कांदे काढणीचे काम करीत होते. सदाशिव कांदे झाकण्यासाठी बांधावरून गट क्रमांक ५२ मधील शेडकडे जात असतांना कडेलाच एक इसम रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसला. हा प्रकार गावात समजताच मलठण मधील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. यातील कोठावळे वस्तीतील पाटीलबा सोपान कोठावळे रा. मलठण यांनी सदर इसमास ओळखत खून झालेला इसम हा आपला चुलतभाऊ असल्याचे व त्याचे नाव दत्तात्रय दादाभाऊ कोठावळे असल्याचे सांगितले. वाव्हळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्ती विरोधात शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास घोडके हे करीत आहेत.