मुंबई सफारी :- वस्तूसंग्रहालय

सामना ऑनलाईन । मुंबई

सात बेटांचे शहर म्हणजे मुंबई. म्हणूनच तर मुंबई बघायला बाहेरगावहून येणारे अनेक जण सर्रास दिसतात. मुंबईच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, पुरातन संस्कृतीचा वारसा जतन करणारे काही कलावशेष आजही मुंबईच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. अशा काही वस्तुसंग्रहालयाची सहल तुम्ही कुटुंबासह नक्की करू शकता.

‘मुंबईतील वस्तूसंग्रहालय ’

१)मणिभवन गांधी वस्तूसंग्रहालय
हे संग्रहालय गावदेवी परिसरात आहे. या संग्रहालयात गांधीजींच्या काही वस्तू, दुर्मीळ छायाचित्रे, चरखा यांसारख्या अनेक वस्तू ठेवल्या आहेत.

mani-bhavan

२)छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय
२०व्या शतकात सुरू झालेले संग्रहालय आजही भक्कम आहे. हे संग्रहालय फोर्टजवळ आहे. या संग्रहालयात हिंदुस्थानी कलाविष्कार, पुरातन काळातील हत्यारे, खडक व खनिजांचे काही अवशेष आणि दुर्मिळ प्रतिकृतीही ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई सफारी :- आर्ट गॅलरी

cst-musume

३)रेड कारपेट वॅक्स म्युझियम
या संग्रहालयात जगभरातील कलाकारांच्या मेणाच्या कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईतील अशाप्रकारचे हे पहिले संग्रहालय असून ते घाटकोपर परिसरात आहे. या कलाकृतींसोबत तुम्ही फोटोदेखील काढू शकता.

wax-musume

४)भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालय
हे संग्रहालय मुंबईतील भायखळा परिसरातील राणीच्या बागेत आहे. या संग्रहालयात सांस्कृतिक वारसा जपणारी काही दुर्मीळ पुस्तके, नकाशे, छायचित्रे पाहायला मिळू शकतात.

bhaudaji-lad-museum

५)नेहरू विज्ञान केंद्र
हे विज्ञान केंद्र वरळीला आहे. येथे दरवर्षी ७ लाखांपेक्षा जास्त माणसे भेट देतात. येथे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या काही मूलभूत तत्त्वे आणि चमत्कारांचा अनुभव आणि आनंद नक्की घेता येईल.

nehru-science-center

६)नेहरू तारांगण
१९७७ साली बनवण्यात आलेले हे तारांगण वरळी येथे आहे. इथे ग्रहताऱ्यांची माहिती सांगणारे माहितीपट दाखवले जातात. या तारांगणाचा सुखद अनुभव खगोलप्रेमींनी नक्की घ्यावा.

मुंबई सफारी :- गार्डन पार्क

nehru-planetarium

७)मुद्रा संग्रहालय
२००४ साली सुरू करण्यात आलेल्या संग्रहालयात ऐतिहासिक आणि जुन्या काळातील १०००० पेक्षा जास्त नाणी जतन करण्यात आली आहेत. काही नवीन जुन्या नोटांबद्दलची माहितीदेखील तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते. हे संग्रहालय फोर्ट परिसरात आहे.

montery-musume

८)क्रिकेट संग्रहालय
२०१२ ला सुरू करण्यात आलेल्या या संग्रहालयाला काही काळातच प्रसिद्धी मिळाली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही एक अनोखी बाब असून तिथे सुनील गावस्कर, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर यांसारख्या अनेक क्रिकेटर्सच्या स्वाक्षऱ्या असलेल्या बॅट्स, बॉल, टी-शर्ट्स यांसारख्या वस्तू तुम्ही येथे पाहू शकता.

cricket-musume

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील आपल्या पसंतीच्या वस्तूसंग्रहालयांची माहिती आम्हाला नक्की कळवा. खाली दिलेल्या प्रतिक्रियेच्या बॉक्समध्ये टाइप करुन ही माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता.