आगळावेगळा संगीत सोहळा

8

सामना ऑनलाईन । मुंबई

‘मिले सूर – सेलिब्रेटिंग द म्युझिकल जर्नी ऑफ जॅझ लिजेंड लुईस बँक्स’ हा आगळावेगळा संगीत सोहळा ८ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता सायन येथील षण्मुखानंद सभागृह येथे होणार आहे. प्रख्यात जॅझ कलाकार लुईस बँक्स यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. चित्रपटांच्या गाण्यांची रचना ते ध्वनिमुद्रण यांपासून सर्वच अंगांमध्ये ते वाकबगार आहेत. पण त्यांची संगीत जगातला ओळख आहे ती ‘की-बोर्ड किंग’ म्हणून. इंडीपॉप, प्रागतिक आणि समकालीन जॅझ तसेच इंडो जॅझ फ्युजनमध्ये त्यांनी लीलया काम केले आहे.

या गौरव सोहळ्यामध्ये उस्ताद झाकिर हुसेन, शंकर महादेवन, तौफिक कुरेशी, शिवमणी, रवी चारी, राकेश चौरसिया, जीनो बँक्स, श्रीधर पार्थसारथी, संजय दिवेचा, शेल्डन डिसिल्व्हा आणि कार्ल पीटर्स सहभागी होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या