ध्वनीक्षेपकाखेरीज निखळ संगीतानुभव

सामना प्रतिनिधी, मुंबई

संगीताच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग कानसेनांना आवडतात. अशाच रसिक प्रेक्षकांना ‘उदयस्वर अॅट पृथ्वी’ या मैफलीच्या माध्यमातून धृपद गायन मैफलीचा आस्वाद घेता येणार आहे… तीही ध्वनीक्षेपकाशिवाय.. शुद्ध सांगीतिक रुपात. पृथ्वी थिएटरमध्ये रविवारी ५नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता ही मैफल रंगणार असून त्यात पेलका नाईक ही तरुण गायिका धृपद हा प्राचीन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतप्रकार सादर करेल. अहमदाबाद येथे जन्म झालेल्या व वाढलेल्या पेलवा यांच्या कुटुंबात शास्त्रीय कला, संगीत, सिनेमा व वाड्.मय यांची परंपराच आहे. पेलवा नाईक यांना डागर घराण्यातून धृपद गायनाचे धडे मिळाले आहेत, तर प्रसिद्ध धृपद गायिका उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर यांच्या त्या शिष्या आहेत. पेलवा यांना संजय आगले हे पखवाजावर साथ देणार आहेत.