दिवाळीच्या दिवशी मुजोर मुसलमानांकडून हिंदू वस्तीवर हल्ला, गावात तणावपूर्ण शांतता

2
छायाचित्र: प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । जामनेर

जामनेर तालुक्यातील पहुर पेठ गावात हिंदूंचा पवित्र सण असलेल्या दिवाळी रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मुजोर मुसलमानांकडून क्षुल्लक कारणावरून हिंदूंच्या घरात घुसून मारहाण करून व वस्तीवर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुस्लिम टोळक्यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात 14 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोन आरोपींना रात्रीच पोलिसांनी अटक करून दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दोन्ही आरोपींना अटक करून सुटका करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की दिनांक बुधवारी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास बारी वाडा व खाटीक वाडा या ठिकाणी गावातील काही मुस्लिम तरुणांनी दारूच्या नशेत  गल्लीत फटाके फोडत असताना येथील काही तरुणांनी या मुस्लिम तरुणांना फटाके फोडण्यास मनाई केली. तेव्हा या तरुणांनी हिंदु तरुणांना शिवीगाळ केली त्यामुळे चिडलेल्या हिंदू तरुणांनी त्यांचा प्रतिकार केला. याचा राग मनात धरून या मुस्लिम तरुणांनी मोहल्ल्यात जाऊन तर सहकार्‍यांना घेऊन हिंदू वस्तीवर लाठ्या-काठ्या फायटर वस्तरे व दगडफेक करत हिंदूंच्या घरांवर चाल करून आले. त्यांना प्रतिकार करीत असताना राजू वामन कलाल या तरुणाला या मुस्लिम टोळक्याने फायटरने मारून डोळ्याला व डाव्या हाताला जबर दुखापत केली.

यावेळी ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे हिंदूंचा सुद्धा जमाव जमला दोन्ही गटांकडून काही काळ दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी  पोलीस निरीक्षक डिके शिरसाट त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मस्जित चौकात हिंदू-मुस्लीम वस्तीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते दोन्ही जमावला पांगवण्यासाठी गावातील शांतता कमिटीचे सदस्य माजी जिल्हा परिषद अशी राजधर पांढरे रामेश्वर पाटील साहेबराव देशमुख पत्रकार गणेश पांढरे गोकुळ कुमावत मुन्ना पठाण पैलवान डॉक्टर मोहिद्दिन शेख शेख कलीम शेख गणि मिनाज भाई आदींनी दोन्ही जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. जमाव शांत झाल्यानंतर जखमी राजू कलाल याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर राजू वामन कलाल यांच्या फिर्यादीवरून आरोपी शाहरुख तडवी, शेख राजू अजित शेख, अझर शेख राजू, आशु तडवी इक्रमुद्दिन इसा सह १४ जणांविरोधात पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींमध्ये शेख राजू शेख वअ यूब कसाई या दोघांना रात्रीच पोलिसांनी अटक करून 8 नोव्हेंबर रोजी जामनेर नजर करून जामिनावर सोडण्यात आले.