राम मंदिराच्या निर्मितीसाठी ३ हजार विटा घेऊन पोहोचले मुस्लीम

सामना ऑनलाईन । अयोध्या

मुस्लीम समाजाचे काही लोक गुरुवारी संध्याकाळी राम मंदिराची मागणी करत अयोध्येत पोहचले. ‘मुसलमानों हक और ईमान के साथ आओ, श्रीराम मंदिर का निर्माण कराओ’ अशा घोषणा त्यांच्याकडून केल्या जात होत्या. राम मंदिराच्या निर्मितीसाठी जवळपास ३ हजार विटादेखील ते सोबत घेऊन आले होते. रामाचं दर्शन करण्यासाठी जात असतांना त्याठिकाणी पोलिसांनी त्यांना रोखलं.

हे सर्व ‘राम मंदिर निर्माण कारसेवक मंच’चे सदस्य होते. राम मंदिराच्या निर्मितीची मागणी करत त्यांनी त्याठिकाणी घोषणाबाजी केली. हे सर्व जण लखनऊ येथून आल्याची माहिती मंचाचे अध्यक्ष आजम खान यांनी दिली. आपल्यासोबत आणलेल्या विटा त्यांना मंदिरापर्यंत न्यायच्या होत्या. मात्र मंदिर बंद असल्याने त्यांना त्या विटांचा ट्रक नयाघाट चौकात उभा करून ठेवावा लागला आहे.