फक्त दाढी ठेवणारे मुस्लिम भयानक दिसतात!

सामना ऑनलाईन, लखनऊ
उत्तर प्रदेशच्या शिया केंद्रीय वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी “फक्त दाढी ठेवणारे मुस्लिम कट्टर असतात आणि ते दिसायला भयानक असतात” असे वक्तव्य केले आहे. रिजवी यांनी गेल्या काही दिवसांत आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. सरकारकडून त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली. रिजवी म्हणाले की “इस्लामध्ये दाढी ठेवण्याची परंपरा आहे, पण जे मुस्लिम मिशी काढून फक्त दाढी ठेवतात ते कट्टर असतात. देशात आणि विदेशात त्यांना दहशतवादी समजले जाते. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे लोक मिशा न ठेवता फक्त दाढी ठेवतात”.

तसेच “असे लोक शरियतच्या नावाने दुसर्‍यांच्या आयुष्यात ढवळा ढवळ करतात, फतवे जाहीर करतात. ज्याचा इस्लाम धर्माशी काही संबंध नाही.” नुकतंच केरळमध्ये एका मुलीला टिकली लावण्यावरून मदरशातून काढण्यात आले. यावर प्रतिक्रिया देत रिजवी म्हणली की “आपल्या देशात लग्नानंतर महिला टिकली किंवा कुंकू लावतात. अशा परंपरा मुस्लीम धर्मात कधीच हराम मानल्या जाऊ शकत नाही.” फतवा जाहीर करणार्‍या मौलानांविरोधात सरकारने मानहानीचा दावा दाखल केला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी सरकराकडे केली.