आरक्षणासाठी आता मुस्लिमही रस्त्यावर

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

न्यायालयाने मंजूर केलेले पाच टक्के आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे, या मागणीसाठी येत्या शुक्रवार, ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिमांचे महाधरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनानंतर सरकारला आठ दिवसांचा वेळ देण्यात येणार असून, त्यानंतर मात्र बेमुदत आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा मुस्लिम विकास समितीच्या वतीने समन्वयक मोहसिन अहेमद यांनी दिला. मुस्लिम विकास समितीच्या वतीने येथील व्हीआयपी सभागृहात आज आरक्षणाच्या मागणीवर आंदोलनाची घोषणा करण्यासाठी मुस्लिमांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.