मटण हंडी

साहित्य १ किलो मटणाचे तुकडे, ७ किसलेले कांदे, २ इंच आल्याची पेस्ट, मीठ, अर्धा चमचा साखर, ४ हिरव्या मिरच्या, १ चमचा कोथिंबीर, २ कप दही, १ लसणाची पेस्ट, अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी, दीड चमचा लाल मिरची, १ चमचा हळद, २ बारीक केलेले टोमॅटो, १ चमचा गरम मसाला.

कृती प्रथम मटणाला अर्धी आलं-लसूण पेस्ट व दही लावून दोन तास ठेवा. एका मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीत २ चमचे तेल गरम करून त्यात कांदे लाल होईस्तोवर परता. त्यात लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला घालून परतून घ्या. त्यात उरलेली आले-लसूण पेस्ट, बारीक केलेले टोमॅटो, मटण व मीठ घालून परतायचे. झाकण लावून झाकणावर पाणी ठेवून मटण शिजू द्या. शेवटी साखर घालून ढवळा, वरून कोथिंबीर पेरा. गरमागरम हंडी मटण जिरा राईस वा रोटीसोबत सर्व्ह करा.