माझा बालमित्र

अभिज्ञा भावे

तुझा मित्र…सेड्रिक जॉन

त्याच्यातली सकारात्मक गोष्ट..सगळ्यांशी खूप माणुसकीने वागतो.

त्याच्यातली खटकणारी गोष्ट.. तो कधीच दिलेली वेळ पाळत नाही.

त्याच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट..त्याने माझ्या लग्नात मला काही सोन्याची नाणी भेट म्हणून दिली आणि सांगितलं की, याचं तुला जे करायचं ते कर किंवा गुंतवणूक म्हणून वापर. ही माझ्यासाठी एक सुंदर भेट होती.

त्याच्याकडून काय शिकलात?..त्याच्या आयुष्यात जेव्हा काही चढ-उतार आले तेव्हा त्याने त्या गोष्टीची झळ कधीच आमच्यापर्यंत येऊ दिली नाही.

त्याचा आवडता पदार्थ..तो कॅथलिक असल्यामुळे त्याला सगळे मराठी पदार्थ खायला आवडतात.

तो निराश असतो तेव्हा…फोन बंद करतो.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण ..वसई

त्याच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण…माझ्या लग्नावेळी पाहुण्यांचं तोच बघत होता. त्यामुळे त्याला लग्नाचा आनंद घेता आला नाही. पण पाठवणीच्या वेळी त्याला खूप वाईट वाटलं म्हणून तो माझ्यासमोर आलाच नाही. नंतर तो हॉटेलमध्ये जाऊन खूप रडला.

तू चुकतेस तेव्हा तो काय करतो..असे खूप कमी प्रसंग असतात, ज्याच्यात मी चुकते आणि असे जास्त प्रसंग असतात ज्यामध्ये तो चुकतो.

भांडण झाल्यावर काय करता? एकदा आमचं खूप भांडण झालं होतं. त्यामुळे आम्ही दोन वर्षे एकमेकांशी बोललो नाही. म्हणून आता कधी भांडण झालं तर तो नमतं घेतो. मी बोलणं बंद करते या भीतीने, काळजीने तो माझी खूप काळजी घेतो.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो?..मला

तुझी एखादी त्याला आवडणारी सवय…मी ज्या काही गोष्टी करते त्या त्यांना फार उशिरा कळतात. ही माझ्याबद्दल त्याची तक्रार असते.

तुलो तो कसा हसवतोत्याच्याबरोबर मी निराश असण्याचा प्रश्नच येत नाही. तो माझा बालपणीचा मित्र असल्याने त्याला माहीत आहे माझा मूड कसा बदलायचा.

एकत्र फिरायला जायचे ठिकाण?…वसईचा किल्ला, जुहू बिच… जिथे जंकफूड मिळतं तिथे आम्ही जातो. कारण आम्हाला जंकफूड खायला खूप आवडतं.

त्याच्याशी मैत्री का करावीशी वाटली ?..जेव्हा मी पहिल्यांदा भेटले तेव्हा मला वाटलं की, याच्यापेक्षा डोक्याने अधू मुलगा या जगात आणि माझ्या इतर मित्रांमध्ये नाही ; कारण तो अभ्यासात लक्ष द्यायचा नाही, क्लासमध्ये बसून विनोद करत राहायचा. मलाही अभ्यास करू द्यायचा नाही म्हणून माझी फार चीडचीड व्हायची त्याच्यावर. पण आता जेव्हा आमची विचार करतो तेव्हा कळतं की, आम्ही एकमेकांना भेटल्याशिवाय राहू शकत नाही.