तू माझ्या आयुष्याची पहाट!

संजय खापरे

 तुमची मैत्रीण अमिता खापरे

तिच्यातली सकारात्मक गोष्ट…मी शूटिंगनिमित्त बाहेर असतो तेव्हा माझं घर सांभाळते. माझ्या मुलांना माझी उणीव भासू देत नाही. नेहमी उत्साही कसं राहायचं हे तिने मला शिकवलं. तिचं असणं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. तिच्यामुळे मी निर्धास्त राहू शकतो.

तिच्यातली खटकणारी गोष्ट..वांगी आणि भेंडीची भाजी खात नाही. एकच गोष्ट खूप वेळा सांगते.

तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट..माझा या क्षेत्रातला बिनधास्तपणे वावर केवळ तिच्यामुळे शक्य आहे. तिचं माझ्या आयुष्यात येणं हीच सुंदर भेट आहे.

 तिच्याकडून काय शिकलात? ..पहाटे लवकर उठायला.

तिचा आवडता पदार्थ…केशर श्रीखंड

ती निराश असते तेव्हा..माझा मुलगा, मुलगी, ती आणि मी फिरायला बाहेर जातो तेव्हा तिचा रुसवा दूर होतो.

एकमेकांसाठी वेळ देता का ?…हो. मी शूटिंगसाठी बाहेर असलो की ती माझ्याबरोबर असते.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण…कोकणातल्या कोणत्याही गावात.

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण..‘यदा कदाचित’ नाटकामुळे मला हनिमूनला जायला मिळालं नाही. लग्नाच्या दीड महिन्यानंतर आम्ही नाटकाच्या दौऱयावर गेलो होतो. तो दौरा आणि नवऱयाबरोबर फिरणं तिने एन्जॉय केलंय.

तुम्ही चुकता तेव्हा ती काय करते..माझी चूक माझ्या तोंडावर सांगते.

भांडण झाल्यावर काय करता?…माझी चूक मी मान्य करतो. तिची चूक असेल तरी ताणून धरत नाही.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ?..मला. पटकन येतो आणि पटकन जातो.

तिचं वर्णन..साधी, सोज्वळ, समंजस बायको.

तुमची एखादी तिला आवडणारी सवय…मला कोणी घरी आले की त्यांना भरभरून द्यायची सवय आहे. तिचं असं म्हणणं असतं की, बेताने द्यावे.

तुमच्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या?…मैत्रीमध्ये एकमेकांच्या चुकांची उणीदुणी काढू नयेत. चुका विसराव्यात. जो जसा आहे त्याला स्वीकारा. मग सगळं छान राहतं.

तुम्हाला कशी हसवते?…फेशियल, मसाज करते. मी खवय्या आहे त्यामुळे नवऱयाच्या पोटातून हृदयापर्यंत जाते.

एकत्र पाहिलेला नाटकसिनेमा ?…‘चांदनी बार’, ‘वऱहाड निघालंय लंडनला.’

एकत्र फिरायला जायचे ठिकाण ?…कोकणात कुठेही फिरायला आवडतं. 

तिच्याशी मैत्री का करावीशी वाटली ?…मला नवरेगिरी करायला आवडत नाही. तिला बायकोगिरी. त्यामुळे आम्ही मिळून मिसळून आयुष्याची वाटचाल चालू ठेवली तर त्यात गंमत आहे हे आम्हा दोघांनाही कळलंय.