व्यायामात वैविध्य आवडते

व्यायामात वैविध्य आवडते – तेजस्विनी सावंत, नेमबाज

 • फिटनेस म्हणजे : शारिरीक आणि मानसिकरीत्या तंदुरुस्त असणे.
 • नेमबाजी की आरोग्य : आरोग्य. कारण आरोग्य उत्तम असेल तर नेमबाजी करू शकते.
 • डाएट की जीवनशैली : जीवनशैली. जर जीवनशैलीत चांगले बदल केले आणि योग्य पद्धतीने आहार, व्यायाम यांचे संतुलन व्यवस्थित असेल तर डाएट करण्याची गरजच नाही.
 • सामान्य माणसासाठी फिटनेस : स्वतःच्या कामाला अनुसरून तुम्ही जितका व्यायाम करू शकता तितका करायला हवा. किमान दिवसातली चाळीस मिनिटे स्वतःसाठी वेळ काढा. चाळीस मिनिटे फास्ट चाला किंवा तासभर व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करा.
 • व्यायाम कसा करावा : कुठल्याही एका पद्धतीचा व्यायाम नसावा. ठरावीक काळानंतर एकाच पद्धतीच्dया व्यायामाचा कंटाळा येतो. त्यामुळे नवीन नवीन व्यायाम करत राहावा त्याने आपली आवड वाढते, उत्साही राहतो आणि महत्त्वाचे त्यात सातत्य टिकून राहते.
 • व्यायाम आणि डाएट समतोल कसा राखता : व्यायाम भरपूर करावा आणि खाण्याच्या बाबतीत अजिबात विचार करु नये. जे तुम्हाला आवडतं ते सगळं खा फक्त जेवढे खाल तेवढय़ापद्धतीने कॅलरीज बर्न करता आल्या पाहिजेत. काय खातो आणि किती खातो त्यापद्धतीने व्यायाम करणं गरजेचे आहे.
 • नेमबाजी म्हणजे दिसणं, आरोग्य की स्पर्धा : माझ्यामते नेमबाजी म्हणजे आरोग्य आdिण स्पर्धा. नेमबाजी म्हणजे तुम्ही किती छान दिसता त्यावर नसते. तुम्ही मानसिक आणि शारिरीकदृष्टय़ा तंदुरुस्त असाल तर त्याचा परिणाम तुमच्या खेळात दिसतो. स्पर्धा खेळल्याशिवाय दैनंदिन जीवनात मजा राहणार नाही. स्पर्धात्मक काहीतरी आयुष्dयात येत राहिले तर लढण्याची ताकद मिळते, जिंकण्याचा आनंद मिळतो, हरलो तर हरल्याचे अवलोकन करता येते, आणखी कसे छान खेळता येईल याचा विचार करता येतो. त्यामुळे स्पर्धा महत्त्वाची आहे.
 • दिवसातून पाणी किती प्यावे : कमीतकमी तीन लिटर पाणी प्यायला हवे. मी तीन-साडेतीन लिटर पाणी पिते.
 • व्यायामाला किती वेळ देता? : एक ते दीड तास.
 • जिमला जायला मिळाले नाही तर? : मस्त चालायला जाते. बऱयाच ठिकाणी असं होतं की आम्हाला व्यायामशाळा नसते किंवा मैदान हवं तसं नसतं अशावेळी भरपूर चालते आणि जिथे राहते त्या रूममध्ये कोअर एक्सरसाईज करते.
 • बाहेर गेल्यावर डाएट कसा सांभाळता? : डाएट हा प्रकार माझ्याकडे नाही. मला जे आवडतं ते खाते, पण खाल्ल्यानंतर व्यायाम करून तेवढय़ा कॅलरीज बर्न करते.
 • बाहेर गेल्यावर कोणत्या गोष्टीची काळजी घेतेस : आजारी न पडण्याची. कारण बाहेर गेल्यावर वातावरण बदलत असते. त्यामुळे स्वतःला फिट ठेवण्याकडे जास्त लक्ष असतो.
 • कोणता पदार्थ नियमित खातेस? : खाणं मला काहीही चालतं. पण चहा. चहाशिवाय मी राहू शकत नाही.
 • फिटनेससाठी कोणत्या गोष्टीचा त्याग केलास? : त्याग कशाचाच नाही. मला जे आवडतं ते सगळं खाते.
 • फिटनेसबाबत अपडेट करण्यासाठी? : जिम ट्रेनर आणि माझे फिजिओथेरपिस्ट यांच्या सतत संपर्कात असते. त्यांचे मार्गदर्शन घेत असते.
 • फिटनेस मंत्र : भरपूर खा पण व्यायाम न चुकता करा. जेवढे खाल तेवढा घाम गाळा आणि आयुष्य आनंदी जगा.