माझा मुलगा माझी ताकद : सोनालीची भावनिक पोस्ट

60

सामना ऑनलाईन | मुंबई

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर तिच्यावर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. आजाराशी सोनाली नेटाने लढा देत आहे. काही दिवसांपूर्वी छानसा हेअरकट केलेला फोटो सोशल मिडीयावर तिने शेअर करीत याची प्रचीती दिली होती. आता तिने आणखी एक फोटो शेअर करीत मुलासोबतचे सुंदर नाते सर्वांसमोर आणलंय आहे. आजाराची बातमी १२ वर्षांच्या मुलाला, रणवीरला सांगणे कठीण होते आणि या लढाईत मुलगा रणवीर कसा तिची ताकद बनला आहे, हे सांगणारी भावनिक पोस्ट सोनालीने लिहिली आहे.

सोनालीने लिहिलंय, १२ वर्षे , ११ महिने आणि आठ दिवसांपूर्वी जेव्हापासून तो माझ्या आयुष्यात आला, तेव्हापासूनच त्याने माझ्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. . तेव्हापासूनच गोल्डी आणि माझ्यासाठी रणवीरचा आनंद हेच सर्वकाही होते. त्यानंतर आता जेव्हा कॅन्सरने डोकं वर काढलं, तेव्हा त्याला याविषयी सांगावं तरी कसं, हाच प्रश्न आम्हाला पडला होता. आम्ही त्याचीच काळजी करत होतोच. पण, परिस्थितीविषयी त्याला माहिती करुन देणंही तितकच महत्वाचं होतं. आम्ही त्याला नेहमीच सर्व गोष्टी सांगत आलो आहोत आणि यावेळीही काही वेगळं नसणार होतं. त्याने कॅन्सरविषयी कळताच अगदी संयमाने, मोठय़ा प्रगल्भतेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणापासून तो माझ्यासाठी प्रेरणेचा आणि आशेचा एक स्रोत झाला आहे. अनेकदा तर तो माझ्या पालकांची भूमिका साकारतो. मला काय करायचं आहे, काय नाही, याची आठवण करून देतो. रणवीरसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असल्याचेही तिने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या