बडगाम जिल्हयात स्फोट, ५ जण जखमी


सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील बडगाम जिल्हयात झालेल्या स्फोटात पाच नागरिक जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा स्फोट तोसा मैदानात झाला. हे सर्वजण अरजाल भागातील रहिवासी आहेत.

दरम्यान, हा स्फोट नक्की कुठल्या स्फोटकाने घडवण्यात आला हे अद्याप समजलेले नाही ,असे जम्मू-कश्मीरचे पोलीस जिल्हा पोलीस अधिक्षक मैगम शौकत अहमद यांनी सांगितले आहे. जखमीना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

summary…mysterious-blast-occured-in-tosa-maidan-of-budgam-district-of-kashmir