नागेश भोसले साकारणार दामू इस्त्रीवाला

ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा स्पर्श लाभलेल्या सोनी सबवरील नमुने या मालिकेत पुलंच्या लेखणीतून अवतरलेल्या व्यक्तिरेखांपैकी एक दामू इस्त्रीवाला ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील निरंजनचे त्याच्या इस्त्रीवाल्याशी भांडण होते आणि तो त्याला कामावरून काढून टाकतो. मग निरंजनला दामू इस्त्रीवाला सापडतो. मात्र दामूला गिर्‍हाईकांचे कपडे ढापण्याची, सतत बढाया मारण्याची सवय असते. दामू आणि निरंजनमध्ये होणार्‍या गमतीजमती नमुनेच्या भागात दिसणार आहेत. दर शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता ‘सोनी सब’ वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.