नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीचा मंत्रिमंडळाचा निर्णय

संग्रहीत फोटो

सामना ऑनलाईन।मुंबई

नागपूर सुधार प्रन्यास हे विकास प्राधिकरण बरखास्त करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महानगर प्रदेश क्षेत्र प्राधिकरण ,नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगरपालिका यांच्यासह एकूण तीन विकास प्राधिकरणे शहरात कार्यरत होती. नागरिकांना त्यांची कामे करताना निर्माण होणारा संभ्रम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

महानगर क्षेत्रासाठी एकच विकास प्राधिकरण असावे अशी मागणी सातत्याने लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. नागपूर महापालिका क्षेत्रासाठी नागपूर महानगरपालिका आणि क्षेत्राबाहेरील महानगर परिसरासाठी प्रस्तावित नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आलं आहे. त्यामुळे नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला.