नागपूर दुहेरी हत्याकांडातील आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपुरातील पत्रकार रविकांत कांबळे यांच्या मातोश्री उषाबाई कांबळे आणि मुलीचा निर्दयतेने खून करणारा आरोपी गणेश शाहूला सोमवारी हुडकेश्‍वर पोलिसांनी न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला शुक्रवार २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उर्वरित तीन आरोपी पत्नी गुडीया गणेश शाहू, भाऊ अंकित शाहू आणि नातेवाईक सिद्धू शाहू यांची पोलीस चौकशी करीत आहेत.

एका वेब पोर्टलमधील पत्रकार रविकांत कांबळे यांची आई उषा सेवकदास कांबळे (५०) आई व दीड वर्षीय चिमुकली राशी ऊर्फ अपेक्षा या शनिवारला घराजवळून बेपत्ता झाल्यानंतर त्या दोघींचा भिशीच्या वादातून घरा शेजारी राहणाºया आरोपी गणेश शाहु व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी हिचा गळा चिरून निर्घृण खुन केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून नाल्यात पुरविल्याचे हृदयद्रावक घटना रविवारला उघडकीस आली. सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दिघोरी घाटावर त्या दोघींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.