नखांचे आरोग्य जपण्याच्या टिप्स

नखांवर गडद काळी रेघ दिसत असेल तर लगेच तपासून घ्या. कारण ते ‘मेलानोमा’ नावाच्या एका त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

नखं पांढरी फट्टक पडलेली असतील तर ते हेपेटायटीस किंवा कावीळ अशा यकृताच्या समस्या असल्याचं दर्शवतात.

हाताच्या बोटांच्या नखाच्या मुळाशी पांढुरका अर्धवर्तुळाकार भाग दिसत असेल तर त्या व्यक्तीला डायबिटीस असण्याची शक्यता असते. पिवळी पडलेली पांढरी नखं फंगल इन्फेक्शन असल्याचं दर्शवतात.

नखांच्या मुळाशी छोटासा पांढरा भाग दिसत असेल तर त्या व्यक्तीला अपचन आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याचे लक्षात येते. शरीरात विषाणू मोठय़ा प्रमाणावर असल्याचं आणि चयापचय कमी होत असल्याचं त्यावरून सिद्ध होतं.

पायाचे नख निळे पडले असेल तर फुप्फुसाची किंवा रक्ताभिसरणाची समस्या असल्याचे निदर्शनास येते. अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याचे त्यावरून स्पष्ट होते.

बोटांच्या नखांवर मुळाशी पांढरा मोठा अर्धवर्तुळाकार भाग दिसत असल्यास ते उत्तम थायरॉईड आरोग्याचे आणि पचनक्रिया चांगली असल्याचे दाखवते.

तळहाताच्या नखांवर पांढरे छोटे छोटे डाग दिसत असतील तर शरीरात व्हिटॅमीन्सची कमतरता असल्याचे स्पष्ट होते किंवा एखाद्या पदार्थाची ऍलर्जी झाल्याचे दिसून येते.

बोटांची नखे वाकडी झालेली असतील तर शरीरात व्हिटॅमीन बी-१२ची आणि लोहाची कमतरता असल्याचे स्पष्ट होते.

नखे तुटलेली, झडलेली असली की त्वचाविकार झाल्याचे लगेच दिसून येते.