नालासोपाऱ्यात धावली वॉटर ट्रेन

सामना ऑनलाईन । नालासोपारा

नालासोपारा रेल्वे स्थानकातील रूळ पाण्याखाली बुडाले होते. लोकल कशाबशा धावत होत्या. पण त्याचवेळी प्लॅटफॉर्म नंबर ४ वरून एक एक्स्प्रेस पाणी उडवत धडधडत गेली आणि प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. पाणी कापत जाणाऱया या ट्रेनचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

दुपारी १२च्या सुमारास लोकलची वाट पाहत ४ नंबर प्लॅटफॉर्मवर  उभ्या असलेल्या प्रवाशांनी लांबवरून येणारी एक्स्प्रेस गाडी पाहिली आणि आता पाणी उडणार, पाणी उडणार असा कल्ला झाला.

रेल्वे रूळ पाण्याखाली गेले असताना त्या एक्स्प्रेसच्या मोटरमनने असा स्टंट करणे गरजेचे होते का असा सवाल आता विचारला जात असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे.