पुलंचे ‘नमुने’ आजपासून बघा

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या लघुकथांवर आधारलेला ‘नमुने’ हा विनोदी शो २१ जुलैपासून रात्री ९ वाजता शनिवारी आणि रविवारी सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अत्यंत हलक्याफुलक्या आणि निखळ मनोरंजन करणाऱ्या या मालिकेत कुणाल कुमार याने निरंजनची भूमिका पार पाडली त्याचे आयुष्य आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये पिचलेला हा निरंजन आयुष्याकडे नकारात्मक दृष्टीनेच बघतो, प्रत्येक टप्प्याकर त्याला दुŠखच दिसते, स्कभाकतःच तो निराशाकादी आहे. त्या उलट स्कभाकाची त्याची पत्नी भैरकी (तोरल रासपुत्र) अत्यंत उत्साही, आनंदी असते आणि छोटय़ा छोटय़ा गोष्टींतसुद्धा ती आनंद शोधत असते. निरंजनला पु. ल. देशपांडेंच्या कथा काचण्याची आकड आहे. एके दिकशी, काईट गोष्टीतही आनंद शोधण्यात निरंजनला मदत करण्यासाठी पु. ल. निरंजनसमोर जिवंत होऊन येतात. पु. लं.ची भूमिका  संजय मोने साकारत आहेत.