आता कोणी दम देत नाही, नाना पाटेकर यांनी व्यक्त केल्या आईविषयी भावना

1

सामना प्रतिनिधी । मुंबई 

आपल्या लेकरासाठी स्वतःच्या सुखांचा त्याग करण्याचं धाडसं जर कोणामध्ये असेल तर ती व्यक्ती म्हणजे आई. सगळ्या प्रेमाची समीकरणं बदलली तरी आई-मुलाच्या प्रेमाच्या समीकरणात किंचितसाही फरक होणार नाही.

जागतिक मातृदिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आईच्या आठवणीत ट्विटरवर भावुक पोस्ट लिहिली. ‘आई तीन महिन्यांपूर्वी गेली आणि मी अचानक मुलाचा म्हातारा झालो. आता कोणी दम देत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. नानांची आई निर्मला पाटेकर यांचे जानेवारीत वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 99 वर्षांच्या होत्या.