बंडखोर नाना पटोलेंना काँग्रेसकडून बक्षिसी

6

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीविरोधात आवाज उठवून भाजपच्या लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिलेल्या नाना पटोलेंना काँग्रेसने बक्षिसी दिली आहे. पटोले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

पंतप्रधानांविरोधात बंड करणारे नेते अशी ओळख निर्माण झालेल्या पटोले यांची आज काँग्रेसने या कामगिरीची दखल घेऊन प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

स्थानिक समीकरणे बदलणार

प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर विरोधक असलेल्या पटोलेंना काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष केल्याने तिथली स्थानिक समीकरणे बदलतील आणि त्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीमधील कथित ऐक्यावर परिणाम होईल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.