‘बाहेर या, लोक तुम्हाला मारतील’, मोदींवर टीका करताना आमदाराची जीभ घसरली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सिनेमातून राजकारणामध्ये आलेले तेलगु देसम पक्षाचे आमदार नंदामुरी बालकृष्ण यांची जीभ भलतीच घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना बालकृष्ण यांनी सर्व मर्यादा ओलांडली.’मोदी हे खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत. ते उत्तर हिंदुस्थान आणि दक्षिण हिंदुस्थानात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत’ असा आरोप त्यांनी केला.

बालकृष्ण पंतप्रधांनावर टीका करत असताना इथेच थांबले नाहीत तर ‘बाहेर निघा आणि तुमचा चेहरा लोकांना दाखवा. तुम्ही कुठेही लपलात तरी लोक तुम्हाला पळून पळून मारतील. तुम्ही बंकरमध्ये लपलात तर भारतमाता तुमहाला तिथेच गाडून टाकेल’. अशी टीका त्यांनी मोदींवर केली. ‘आंध्र प्रदेशात; नाही तर संपूर्ण दक्षिण हिंदुस्थानात भाजपची एकही जागा निवडून येणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने टीडीपी एडीएतून बाहेर पडली आहे. तसेत टीडीपीने मोदी सरकारविरोधार अविश्वास ठराव आणण्याचीही तयारी केली होती. भाजपने आंध्र प्रदेशच्या दिलेल्या वागणुकीमुळेच टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे बालकृष्ण यांनी सांगितले. ‘आम्ही चार वर्ष वाट पाहिली. त्यामुळे आता तेलुगू लोकं मोदींना त्यांची शक्ती दाखवतील’ असंही ते म्हणाले.