अट्टल दरोडेखोरास अटक

1

सामना प्रतिनिधी। नांदेड

राज्यात विविध ठिकाणी दरोडे, चोऱ्या करणाऱ्या एका अट्टल दरोडेखोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परभणी येथून ताब्यात घेतले आहे.

लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील नागनाथ शिवाजी बुळगुंडे यांच्या घरात 14 जून 2018 रोजी अज्ञात आरोपींनी चोरी केली होती. या चोरीत चोरट्यांनी त्यांच्या आई व बहिणीच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने व मोबाईल असा एकूण 53 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना या गुन्ह्यातील आरोपी परभणी येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने परभणी येथून आरोपी रोशनसिंग जुन्नी यास ताब्यात घेतले. आरोपीची विचारपूस केली असता माळाकोळी व साडेचार महिन्यापूर्वी नाशिक येथे दरोडा टाकला असल्याची कबुली त्याने दिली. आरोपीला पुढील कारवाईसाठी माळाकोळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पी.डी.भारती, पोकॉ. ब्रम्हा लामतुरे, शेख जावेद, शेख अलीम, व्यंकट गंगूलवार, शंकर वेंâद्रे यांच्या पथकाने आरोपी रोशनसिंग जुन्नी यास अटक केली.