नांदेड गुरुद्वाऱ्याच्या अध्यक्षनिवडीच्या प्रक्रियेला बोर्डाच्या व्यवस्थापन समितीचा विरोध


सामना प्रतिनिधी, नांदेड

नांदेड ही शिखांची दक्षिण काशी आणि मान्यताप्राप्त धर्मपीठ आहे. असे असताना शासनाने १९५६ च्या कायद्यात बदल करुन अध्यक्ष नियुक्त करण्याचे अधिकार स्वतःकडे ठेवले आहेत. ही बाब लोकशाहीचा गळा घोटणारी असून, कलम ११ रद्द करुन अध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार गुरुद्वारा बोर्डाकडे देण्यात यावा, अशी मागणी गुरुद्वारा बोर्डाचे नवनिर्वाचित सदस्य तथा व्यवस्थापन समिती सदस्य रविंद्रसिंघ बुंगई यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नांदेड ही शिखांची दक्षिण काशी आणि मान्यताप्राप्त धर्मपीठ आहे. येथील कारभार पाहण्यासाठी १९५६ च्या महाराष्ट्र कायद्याने गुरुद्वारा बोर्डाची निर्मिती करण्यात आली. परंतू शासनाने या कायद्यात बदल करुन अध्यक्ष नियुक्त करण्याचे अधिकार स्वतःकडे ठेवले आहेत. यामुळे लोकशाहीची मूल्ये तुडविण्यात येत आहेत. यामुळे कलम ११ विरोधात नांदेड येथील शिख संगतच्या मनामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, लोकशाहीची पुनःस्थापना करत कलम ११ रद्द करुन अध्यक्ष निवडीचा अधिकार गुरुद्वारा बोर्डाकडे द्यावा, अशी मागणी गुरुद्वारा शहीद बाबा भुजंगसिंघजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा गुरुद्वारा बोर्डाचे नवनिर्वाचित रविंद्रसिंघ बुंगई यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.