डांबर घोटाळ्यातील इतर आरोपी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान


सामना ऑनलाईन, नांदेड

नांदेड शहरात झालेल्या डांबर घोटाळ्याप्रकरणातील 4 कंत्राटदारांना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी २ कंत्राटदारांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात सतीश देशमुख हा बडा मासा असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र तो अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासात देशमुख याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांमध्ये गंजेवार नावाचे डांबर चलान सापडले आहे. हा गंजेवार कोण याचं कोडं उलगडण्याचा सध्या पोलीस प्रयत्न करत आहेत.

हिंगोलीत डांबर घोटाळा, सरकारचे ५ कोटी २१ लाखाचे नुकसान

नांदेड येथे डांबर घोटाळाप्रकरणी सहाय्यक अभियंता कोटलवार यांच्या तक्रारीवरुन डांबर घोटाळ्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घोटाळ्याप्रकरणी मनोज मोरे आणि भास्कर कोंडा या दोघांना पोलिसांनी 3 सप्टेंबरला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिजित फसके यांच्याकडे आहे.

नांदेडमध्ये कोट्यवधींचा डांबर घोटाळा उघड

या प्रकरणात पोलीसांना न सापडलेले कंत्राटदार सतिश देशमुख यांनी केलेल्या कामासंदर्भाने दाखल करण्यात आलेल्या डांबर चालानावर गंजेवार असे नाव आहे. या संदर्भाची सखोल चौकशी करून माहिती घेतली असता नवा मोंढा भागात गंजेवार ट्रेडर्स नावाचे एक दुकान आहे ते या गंजेवारांचे आहे. त्यांचे नाव संजय गंजेवार असे आहे. त्यांचे डांबर गोडाऊन औद्योगिक वसाहतीमध्ये असल्याचे सांगण्यात आले.