अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम; जपानच्या 20 वर्षीय ओसाकाची फायनलमध्ये झेप

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

जपानच्या 20 वर्षीय नाओमी ओसाका हिने गुरुवारी मध्यरात्री इतिहास रचला. तिने सेमी फायनलच्या लढतीत गत उपविजेती मॅडीसन कीजला पराभूत करीत अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता ऐतिहासिक जेतेपदापासून ती एक पाऊल दूर आहे, मात्र तिच्या मार्गात अडथळा आहे तो 23 ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाची मानकरी असलेल्या सेरेना विल्यम्सचा.

पहिलीच टेनिसपटू
ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचणारी नाओमी ओसाका ही जपानची पहिलीच टेनिसपटू ठरलीय. तिने 14 व्या सीडेड मॅडीसन कीजचा 6-2, 6-4 असा धुव्वा उडवला.

नवव्यांदा अंतिम फेरीत
सुपर मॉम सेरेना विल्यम्स हिने उपांत्य फेरीच्या लढतीत अनास्तासिझा सेवास्तोवा हिला 6-3, 6-0 असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले आणि फायनलमध्ये धडक मारली. अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची तिची नववी खेप.

summary- naomi osaka reached final in us open