मोदींनी पुन्हा एकदा दिली झप्पी आणि…

45

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या दौऱ्यावर असलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचं आज (शुक्रवारी) राष्ट्रपती भवनात औपचारिकरित्या स्वागत करण्यात आलं. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना घट्ट आलिंगन देऊन स्वागत केलं. पंतप्रधान मोदींनी दुसऱ्या देशाच्या नेत्याचं असं स्वागत करणं हे काही नवीन नाही त्यामुळे मोदींच्या या स्वागताच्या स्टाईलची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मोदींच्या अशा भेटवण्यावरून विरोधकांनी त्यांची अनेकदा खिल्ली उडवली आहे.

पाहा आधी कुणाकुणाचं मोदींनी आलिंगन देत केलं स्वागत

खरं तर पंतप्रधान मोदी त्यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर न गेल्याने मोठी चर्चा रंगली होती. मात्र आज मोदींची भेट झाली आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला. जस्टिन ट्रुडो त्यांची पत्नी सोफी आणि मुलांसोबत राष्ट्रपती भवन येथे पोहोचले. तेथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

जस्टिन ट्रुडो यांचा हा दौरा वादग्रस्त राहिला आहे. कारण गुरुवारी खलिस्तानच्या दहशतवाद्यासोबत त्यांच्या पत्नीचा फोटो वृत्तपत्रांमध्ये छापून आला आणि त्यामुळे वाद उफळला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या